शिक्षकाने घेतले विद्यार्थ्याला चावे

By Admin | Updated: July 7, 2014 04:49 IST2014-07-07T04:49:05+5:302014-07-07T04:49:05+5:30

एका शिक्षकाने दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्याच्या सर्वांगावर अनेक चावे घेतल्याची घृणास्पद घटना बिहारच्या शेखपुरा येथील एका खासगी निवासी शाळेत उघडकीस आली आहे़

The teacher took the bite to the student | शिक्षकाने घेतले विद्यार्थ्याला चावे

शिक्षकाने घेतले विद्यार्थ्याला चावे

शेखपुरा(बिहार) : एका शिक्षकाने दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्याच्या सर्वांगावर अनेक चावे घेतल्याची घृणास्पद घटना बिहारच्या शेखपुरा येथील एका खासगी निवासी शाळेत उघडकीस आली आहे़ आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे़
बारहबिघा येथील एका खासगी निवासी शाळेत दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली़ पालक भेटायला गेल्यावर त्यांना आपल्या मुलाची ही दुर्दशा दिसली़ त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर या घटनेचे बिंग फुटले़
पालकांनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे आरोपी शिक्षक त्या रात्री मुलासोबत झोपला व त्याने त्याच्या गालावर, चेहऱ्यावर आणि अनेक महत्त्वपूर्ण अंगावर चावे घेतले़ पीडित विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरूआहेत़ घटना उघडकीस येताच शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोघ घेत आहेत़ (वृत्तसंस्था)

Web Title: The teacher took the bite to the student