शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, शाळेत काढली नग्न धिंड, जमिनीवर बसू खायला लावलं अन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 20:12 IST

पहिलीत शिकणा-या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण करत, संपुर्ण शाळेत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे

रायबरेली - पहिलीत शिकणा-या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण करत, संपुर्ण शाळेत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. मुलाच्या वडिलांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शाळा प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले असून निराधार असल्याचा दावा केला आहे. मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार घडला असून, सहा वर्षीय विद्यार्थी पहिलीत शिकत आहे. 

मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, '23 ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. यावेळी कोणत्यातरी कारणावरुन शिक्षिकेने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे त्याच्या चेह-यावर आणि गळ्यावर जखम झाली आहे'. मारहाणीमुळे मुलगा प्रचंड घाबरला असून, शाळेत जाण्यास नकार देत आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

पीडित मुलाने सांगितलं आहे की, शिक्षिकेने त्याला प्रचंड मारहाण केली. कपडे काढून संपुर्ण शाळेत फिरवलं, आणि नंतर जमिनीवर बसून जेवायला लावलं. पोलिसांनी तक्रार मिळाली असून, तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. 

शाळेच्या मुख्याध्यापिका वीना खन्ना यांचं म्हणणं आहे की, मुलाचे आई-वडिल जे आरोप करत आहेत ते निराधार आहेत. 'जर त्यांची काही तक्रार होती तर त्यांनी शाळेत येऊन तक्रार करायला हवी होती. त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची काय गरज होती. शाळेत मुलाला कोणत्याही प्रकारे टॉर्चर करण्यात आलेलं नाही', असं त्यांनी सांगितलं आहे. 

काही दिवसांपुर्वीही असंच एक प्रकरण समोर आलं होतं. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका शाळेत नववीत शिकणा-या 13 वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये त्याच्या गुप्तांगाला जखम झाली होती. भुगोलाचं पुस्तक घरी विसरल्याने शिक्षकाने मारहाण केली होती. विद्यार्थ्याच्या गुप्तांगावरही मारहाण झाली होती. प्रकृती खराब झाल्याने विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा