पटसंख्येच्या वजाबाकीने शिक्षक चिंतेत
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

पटसंख्येच्या वजाबाकीने शिक्षक चिंतेत
>जिल्हा परिषद : विद्यार्थीसंख्येची जुळवाजुळव नागपूर : पालकांचा कल विचारात घेता ग्रामीण व शहरालगतच्या भागात इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. याचा फटका बसल्याने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळातील पटसंख्या १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. पटसंख्येच्या वजाबाकीमुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे. प्राथमिक शाळातील इयत्ता चौथ्या वर्गातून उत्तीर्ण होऊ न विद्यार्थी पाचवीत जातात. परंतु पहिल्या वर्गात त्या तुलनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांर्ंची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे.नागपूरसह जिल्ह्यात शहरालगतच्या जमिनीच्या किमती मागील काही वर्षात प्रचंड वाढल्या आहेत. शहराजवळ एक -दोन एकर शेती असणारा अल्पभूधारक आता करोडपती झाला आहे. जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसा आला. याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावरही पडला आहे. यातूनच आपल्या पाल्यांना इंग्रजी वा सेमी इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्याऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशीच अवस्था खासगी अनुदानित वा विना अनुदानित शाळांची आहे. शाळेत विद्यार्थी असेल तोवरच नोकरी असल्याने अशा शाळातील शिक्षकांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)बॉक्स....प्रस्ताव कागदावरचमराठी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्याची पटसंख्या दरवर्षी क मी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालक ांचा कल लक्षात घेता जि.प.च्या शिक्षण समितीचा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव व शासन मंजुरीची प्रतीक्षा यामुळे हा प्रस्ताव कागदावर आहे.बॉक्स...शिक्षकांची भटकंतीदरवर्षी पटसंख्या कमी होत असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. समायोजनात सर्वाना समावून घेतले जाईलच याची शाश्वती नसल्याने अतिरिक्त शिक्षकांची चिंता वाढली आहे. पटसंख्या कायम राहिली तर इतर भानगडी टळतील म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात भटकंती सुरू झाली आहे.