शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएमधून टीडीपी बाहेर पडणाच्या मार्गावर? चंद्राबाबू नायडूंनी दिले संकेत   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 16:14 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दक्षिणेकडील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडणाच्या मार्गावर आहे. याबाबतचे टीडीपीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संकेत दिले आहेत.

हैदराबाद : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दक्षिणेकडील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडणाच्या मार्गावर आहे. याबाबतचे टीडीपीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संकेत दिले आहेत. काल (दि.1) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही, म्हणून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नाराज झाले आहेत. त्यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी टीडीपीच्या सर्व नेत्यांची तात्काळ बैठक बोलविली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेश राज्यासाठी कोणत्याही योजनांची घोषणा करण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर टीडीपीच्या खासदारांनी अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे विभागासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. तसेच नवी राजधानी अमरावतीबाबातही कोणतीही घोषणा केली गेली नाही, असे पीडीपीच्या खासदारांनी सांगितले आहे. आम्ही याबाबात लवकरच निर्णय घेणार आहोत. आमच्याकडे तीन पर्याय आहेत. सध्या प्रयत्न सुरु ते चालूच ठेवू. दुसरा म्हणजे पार्टीचे खासदार राजीनामे देणार आणि तिसरा पर्याय म्हणजे एनडीएतून बाहेर पडण्याबाबत आहे. दरम्यान, याबाबत आम्ही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत, असे टीडीपीचे खासदार टीजी व्यंकटेश यांनी दिल्लीत सांगितले. याचबरोबर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी चंद्राबाबूंनी एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Andhra Pradeshआंध्र प्रदेशChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू