शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: "ONGC कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला पेट्रोलियम मंत्री जबाबदार; पंतप्रधान मोदींनी राजीनामा घ्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 13:50 IST

Tauktae Cyclone: शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र; पेट्रोलियम मंत्री, ओएनजीसीच्या एमडींचा मागितला राजीनामा

मुंबई: अरबी समुद्रात असलेल्या ओएनजीसीच्या बार्जला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि ओएनजीसीचे व्यवस्थापकीय संचालकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. यासंदर्भात सावंत यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. ओएनजीसी कंपनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अखत्यारित येते. मग राज्यात उठसूठ राजीनामे मागणारे मंत्री प्रधान यांचा राजीनामा का मागत नाहीत, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. (shiv sena mp arvind sawant seeks Petroleum Minister Dharmendra Pradhans resignation)पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद'ओएनजीसीसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडली असती, तर भाजपच्या नेत्यांनी सरकारमध्ये असलेल्या लोकांचे राजीनामे मागितले असते. ओएनजीसी पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भाजप नेते धर्मेंद्र प्रधान या मंत्रालयाचे प्रमुख आहेत. मग आता भाजप नेते त्यांचा राजीनामा का मागत नाहीत? या मोठ्या जीवितहानीला जबाबदार कोण? त्यांना नुकसान भरपाई कोण देणार? केवळ एकमेकांकडे बोटं दाखवून काय होणार?' असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले.हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला 'तौक्ते चक्रीवादळाचा फटका समुद्रात असलेल्या ओनएसजीच्या बार्जला बसला. या दुर्दैवी घटनेत ओएनजीसीच्या २३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. देशासाठी योगदान देणारी माणसं अशाप्रकारे गमवावी लागणं हे अतिशय दु:खद आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी पेट्रोलियम मंत्री आणि ओएनजीसीच्या एमडींचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळArvind Sawantअरविंद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदीONGCओएनजीसी