शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: मोदींनी महाराष्ट्र, केरळ यांना जादा मदत करावी, सुब्रमण्यम स्वामींचा मोदींना घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 08:46 IST

Tauktae Cyclone: स्वामी यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानभरपाईवरुन सरकारला घरचा अहेर दिला आहे.

नवी दिल्ली: “तौउते” चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि केरळसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला दिलेल्या आर्थिक मदतीपेक्षा जास्त निधी देण्याची मागणी करुन भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना घरचा अहेर दिला आहे.  स्वामी यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानभरपाईवरुन सरकारला घरचा अहेर दिला आहे. या वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी एकट्या गुजरताला एक हजार कोटी रुपयांच्या आर्थ‍िक मदतीची घोषणा करून राज्य सरकारला मदतीचा धनादेशही दिला होता. त्यावरुन स्वामी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, की पंतप्रधान गुजरातला गेले आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला. आता त्यांनी प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे. या ठिकाणी अधिक नुकसान झाले आहे. मात्र, मोदींना त्याची पाहणी करण्यासाठी जाता आले नाही.यापूर्वीही केलेली टीकास्वामी यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारवर टीका केली आहे.  गेले काही दिवस स्वामी सतत सरकारविरुद्ध बोलत आहेत. कधी अर्थमंत्री सीतारामन, तर कधी डॉ. हर्षवर्धन यांच्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामींच्या ट्विटला महत्त्व आहे. महाराष्ट्र व केरळला मदत द्यावी, असे जाहीरपणे म्हणणारे ते भाजपचे पहिलेच नेते आहेत. महाराष्ट्र वा केरळमधील भाजप नेत्यांनीही ही मागणी केलेली नाही, हे विशेष.  दिल्ली नको, इंद्रप्रस्थ हवेसुब्रमण्यम स्वामी यांनी राजधानीचे दिल्लीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिस्त्रा यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. मुघल साम्राज्यातील रेकॉर्ड व ब्रिटिशांनी काढलेल्या अधिसूचनेतही दिल्लीचा इंद्रप्रस्थ असा उल्लेख असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMaharashtraमहाराष्ट्रKeralaकेरळSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदी