एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 10:33 IST2025-07-04T10:33:22+5:302025-07-04T10:33:43+5:30

Railway Tatkal Ticket Booking: रेल्वेच्या तत्काळ तिकिटांच्या आरक्षणामध्ये दलाल आणि बॉट्सचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्यांना तिकीट मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी नवा नियम लागू केला होता. मात्र तरीही यातूनही काही जणांनी पळवाट काढली असल्याची माहिती समोर येत आहे.

Tatkal ticket in one minute, such a loophole was created after the new railway rules, racket active on Telegram | एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय

एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय

रेल्वेच्या तत्काळ तिकिटांच्या आरक्षणामध्ये दलाल आणि बॉट्सचा सुळसुळाट झाल्याने सर्वसामान्यांना तिकीट मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी नवा नियम लागू केला होता. मात्र तरीही यातूनही काही जणांनी पळवाट काढली असल्याचे तसेच टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवरून काही जणांनी आधार व्हेरिफाईड आयडींची विक्री सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हजारो एजंट सक्रिय असून, सरकारच्या नियंत्रणानंतरही हा धंदा धडाक्यात सुरू असल्याचे उघड झाले आहे.

यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ आज तकने प्रसिद्ध केले आहे. १ जुलैपासून रेल्वेकडून तत्काळ तिकिटांच्या विक्रीसाठी नवा नियम लागू झाला आहे. तसेच ही तिकीटे केवळ आयआरसीटीसीचं संकेतस्थळ आणि अॅपवरच उपलब्ध आहेत. तसेच तत्काळ तिकिटांचं बुकिंग करण्यासाठी आपल्या खात्याचं आधारकार्ड लिंक असणं आवश्यक आहे. मात्र रेल्वेने हा नियम लागू केल्यापासून सोशल मीडियावर ई-तिकिटांशी संबंधित टोळ्या सक्रिय झाल्या असून, त्यांनी गडबड करण्यास सुरुवात केली आहे. या टोळ्यांकडून आधार व्हेरिफाईड आयडी आणि ओटीपींची धडाक्याने विक्री केली जात आहे.

या ई-तिकिटिंग रॅकेटमध्ये केवळ एजंटच नाही तर तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि फेक सर्व्हिस देणाऱ्यांचाही समावेश आहे. आयआरसीटीसीच्या प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा घेण्याचा दावा ते करतात. तसेच ही मंडळी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपलं काम चालवतात. तसेच आपली ओळख लपवण्यासाठी त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय फोन नंबरचा वापर होतो.

दरम्यान, या रॅकेटकडून आधार व्हेरिफाईड आयआरसीटीसी युझरची आयडी केवळ ३६० रुपयांना विकली जात आहे. या खात्यांचा वापर कथितपणे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आणि ओटीपी मिळवण्यासाठी केला जातो. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया मेन्युअल होत नाही. एजंट बुकिंगला वेग देण्यासाठी आणि खऱ्या युझर्ससाठी सिस्टिम ओव्हरलोड करण्यासाठी बॉट आणि ऑटोमॅटिक ब्राउझर एक्स्टेंशनचा उपयोग केला जातो.

या बेकायदेशीर नेटवर्कच्या मागे असलेले रॅकेटचे म्होरके आणि तांत्रिक विषयातले मास्टरमाइंड एजंट्सनां बॉटची विक्री करत असतात. एजंट्सना हे बॉट्स आपल्या ब्राऊझरमध्ये इन्स्टॉल करण्यास आणि ऑटोफिल फिचरचा उपयोग करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे खऱ्या युझर्सपेक्षा ते अधिक गतीने तिकीट बुकिंग करतात. तर खऱ्या युझर्सनां वेबसाईटची संथ गती आणि ट्रान्झॅक्शन रद्द होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

कथितपणे हे बॉट्स आयआरसीटीसीच्या लॉगइन क्रेडेंशियल, ट्रेनची माहिती, प्रवाशांची माहिती आणि पेमेंटची आकडेवारी आपोआप भरतात. ही पूर्ण प्रक्रिया ही ऑटोमेटिक पद्धतीने पूर्ण होते. तसेच एका मिनिटामध्ये हमखास कन्फर्म तिकीट मिळते. 

Web Title: Tatkal ticket in one minute, such a loophole was created after the new railway rules, racket active on Telegram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.