शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Lockdown: टाटा ट्रस्टचा सर्वे: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'या' गोष्टीचा सर्वाधिक त्रास; पण फायदाही झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:09 IST

Police behavior in lockdown: टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

कोरोना काळात (Corona Pandemic) सर्वाधिक त्रास जर कोणत्या यंत्रणेला झाला असेल तर तो आरोग्य आणि पोलिसांना. पहिल्या लॉकडाऊन (First Lockdown) काळात या परिस्थितीचा कोणीच अनुभव घेतला नव्हता. यामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड देणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांची तपासणी करणे आदी कामे जोखिम पत्करून करावी लागत होता. याच काळात घरगुती हिंसा आणि सायर क्राईमचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणावर वाढले होते. लोकनीति, टाटा ट्रस्ट, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज़ने सर्वे केला आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. (Lockdown Survey: Police used force during lockdown but were helpful too)

टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

82 टक्के पोलिसांनी सांगितले की प्रवासी मजुरांनी लॉकडाऊन लागला तेव्हा खूप त्रास दिला. त्यांना सांभाळण्यासाठी, नियंत्रणासाठी 49 टक्के पोलिसांनी सांगितले की बळाचा वापर करावा लागला. 64 टक्के नागरिकांना सांगितले की, सरकारने लॉकडाऊन लावण्याआधी काही वेळ द्यायला हवा होता. 45 टक्के पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर सामान्य नागरिकांसोबत ट्रॅव्हल पासवरून सर्वाधिक बाचाबाची झाली. श्रीमंतांनी आम्हाला चांगली वागणूक दिली तसेच कायदा पाळण्यासाठी मदत केली. 24 टक्के पोलिसांनी सांगितले की, गरीब लोकांनी आम्हाला सर्वाधिक पाठिंबा, मदत केली. 

पोलिसांना काय फायदा झाला....सर्वेमध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये लॉकडाऊन काळात पोलिसांनी आपले काम इमानदारीने केल्याचे 86 टक्के नागरिकांनी सांगितले. 65 टक्के लोकांनी पोलिसाच्या नेहमीच्या वागणुकीपेक्षा त्यावेळची वागणूक चांगली होती, त्यांची प्रतिमा सुधारली आहे, असे सांगितले. तर 32 टक्के लोकांनी पोलिसांच्या प्रतिमेत काहीच सुधार झाला नसल्याचे सांगितले. 36 टक्के लोकांनी पोलिसांनी नियम पाळण्यासाठी अधिकारांची भीती दाखविल्याचे सांगितले. 55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले.

57 टक्के लोक घरातच

55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले. 57 टक्के लोकांना पोलिसांची भीती वाटत होती, म्हणून ते घराबाहेर पडले नाहीत. 43 टक्के लोकांना पोलिस त्यांना पकडून घेऊन जातील आणि कोरोना चाचणी करतील अशी भीती होती. तेवढ्याच लोकांना पोलीस अटक करतील अशी भीती होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसTataटाटा