शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आजच्याच दिवशी 75 वर्षांपूर्वी एअर इंडियाचा पहिला परदेश दौरा; मुंबई ते लंडनचे भाडे फक्त 1720 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:32 IST

जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

नवी दिल्ली: 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 8 जून 1948 रोजी एअर इंडियाच्याविमानाने पहिल्यांदा परदेशात उड्डाण केले होते. एअर इंडियाने पहिल्यांदाच 35 प्रवाशांसह परदेशी भूमीवर पाऊल ठेवले. आज 8 ते 10 तासांमध्ये होणाऱ्या प्रवासाला तेव्हा दोन दिवस लागले होते. एअर इंडियाच्या मलबार प्रिन्सेस विमानाने मुंबई(तेव्हा बॉम्बे)वरुन लंडनसाठी पहिले उड्डाण केले होते. 

48 तासांत पूर्ण झाला प्रवासकायरो आणि नंतर जिनिव्हा मार्गे एअर इंडियाचे पहिले परदेशात उड्डाण यशस्वीपणे पूर्ण करणारे कॅप्टन केआर गुजदार यांनी या विमानाचे नेतृत्व केले होते. एअर इंडियाने मुंबई ते लंडन हे पहिले उड्डाण 48 तासांत पूर्ण केले होते. एअर इंडियाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. टाटा एअर इंडियाच्या फ्लाइटमधून लंडनला जाणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे काढण्यात पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. एअर इंडियाची मलबार प्रिन्सेस 35 प्रवाशांसह नियोजित वेळेवर निघाली. यातील 29 प्रवासी लंडनला तर 6 जण जिनिव्हाला उतरले होते.

विमानात कोण कोण होते...एअर इंडियाने 3 जून 1948 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी पूर्ण पानाची जाहिरात केली होती. पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट फक्त 1720 रुपये होते. पायलट व्यतिरिक्त फ्लाइटचे क्रू मेंबर्सही खूप उत्साहित होते. निळा कोट आणि स्काय ब्लू स्कर्ट घातलेली एअर होस्टेसही तिच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सज्ज होती. जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते. या विशेष विमानात महाराजा दुलीप सिंग, काही इंग्रज आणि व्यापाऱ्यांसह काही खेळाडूदेखील होते. आज या प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमानAirportविमानतळ