तरुण तेजपालविरोधातील बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला SCची ९ मेपर्यंत स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 12:27 IST2018-04-24T12:27:31+5:302018-04-24T12:27:31+5:30
सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून, 9 मेपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.

तरुण तेजपालविरोधातील बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला SCची ९ मेपर्यंत स्थगिती
पणजी: पत्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी पत्रकार तरुण तेजपाल याला कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने तरुण तेजपालची याचिका फेटाळली होती. त्यानंतर तेजपाल यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असून, 9 मेपर्यंत सुनावणी स्थगित केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात तेजपालच्या याचिकेवरील सुनावणी 12 डिसेंबर 2017ला पूर्ण झाली होती. न्या. नूतन सरदेसाई यांनी निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालयाने तेजपालच्या विरोधात निर्णय दिला होता. आरोपपत्र रद्द करण्याची त्याची मागणी फेटाळण्यात आली.
Rape case against Tarun Tejpal: Supreme Court adjourned the matter for May 9. (File Pic) pic.twitter.com/DxkBnBn5bO
— ANI (@ANI) April 24, 2018
काय आहे प्रकरण ?
2013साली एका तारांकित हॉटेलात आपल्या सहकारी महिलेवर तेजपाल यांनी केलेल्या कथित बलात्कार प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रांच) तेजपाल विरोधात 17 फेब्रुवारी 2014 साली विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सुमारे 79 दिवसांत तपास अधिकारी उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी हे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रात 150 साक्षीदार नोंद करण्यात आलेले. 30 नोव्हेंबर 2013 रोजी तेजपालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांत त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता.