शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तेजपालला दिलासा नाहीच, म्हापसा न्यायालयात खटला चालणारच, २८ रोजी होणार आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 19:57 IST

लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकेचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली.

पणजी, दि. २६ - लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकाचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे तेजपालवर २८ सप्टेंबर रोजी म्हापसा सत्र न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सहकारी पत्रकार महिलेवरील बलात्कार  प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यावर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया म्हापसा न्यायालयात सुरू केली असता त्याला तेजपालने आक्षेप घेतला होता. ही कारवाई त्वरित रोखण्यात यावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल करण्या आली होती. तांत्रिक बाजूवर बोट ठेऊन या प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करण्याची मागणी तेजपालचे वकील अमन लेखी यांनी केली होती. तेजपालला खोट्या प्रकरणात गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते. क्राईम ब्रँचने त्याला जोरदार आक्षेप घेतला होता. काय खरे आणि काय खोटे याचा छडा खटला चालवूनच लावणे योग्य होईल असे अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी न्यायालयाला सांगितले होते.  मंगळवारी या प्रकरणात निवाडा देताना तेजपालची याचिका खंडपीठाने फेटाळली. तसेच या प्रकरणाचा खटला म्हापसा न्यायालयात चालणार असल्याचे सांगितले. २८ सप्टेंबर रोजी म्हापसा न्यायालयात तेजपालवर आरोप निश्चित केले जातील. दरम्यान तेजपाल यांना दिलासा दिला नसला तरी त्यांची याचिकाही निकालात काढण्यात आलेली नाही. हे प्रकरण पुन्हा नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.या प्रकरणात तेजपालविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या आरोपांना खंडपीठाची मंजुरी मिळाल्यानंतरच खटला सुरू करण्यात यावा असेही खंडपीठाने सुनावले. 

 ‘न्यायाधीश नव्हे, आक्षेप निरर्थक’आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे निरर्थक असल्याचे स्पष्ट करूनही आणि आपल्याविरुद्ध ज्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ती कलमे आपल्याविरोधात लागू होत नाही हे सांगूनही म्हापसा न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही. या प्रकरणात आदेश देताना न्यायाधिशाने बुद्धीचा वापर केला नाही असे तेजपालचे वकील लेखी यांनी खंडपीठात न्यायमूर्ती पृथ्विराज चव्हाण यांच्यासमोर केला. परंतु  क्राईम ब्रँचचे वकील अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी जोरदार आक्षेप घेताना म्हापसा न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्यासाठी पूर्ण वेळ दिली होती आणि आदेश सुनावताना ४७ पानी स्पष्टीकरणही दिले होते असे सांगितले. तेवढे सांगून ते म्हणाले की ‘न्यायाधीशाने बुद्धीचा वापर केला नाही हे चुकीचे असून वास्तवीक तुमचे आक्षेप निरर्थक आहेत’ असे सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारCrimeगुन्हाIndiaभारत