शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

त्या प्रत्येकासोबत असंच होणार, बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी घेत या दहशतवादी संघटनेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:55 IST

Target Killing In Kashmir: जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्याबरोबरच या दहशतवादी संघटनेने एक पत्र प्रसिद्ध करून जो कुणी काश्मीरच्या डोमोग्राफिक बदलामध्ये सामील होईल, त्याच्यासोबत असंच केलं जाईल, असा इशारा दिला आहे.

काश्मीर फ्रीडम फायटर्सने पत्र प्रसिद्ध करून सांगितले की, कुलगाममध्ये आमच्या कॅडर्सनी गोपनीय माहितीच्या आधारावर ऑपरेशन पूर्णत्वास नेले आहे. यामध्ये एक बँक कर्मचारी विजय कुमार यांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये डेमोग्राफिक बदलामध्ये जे कुणी सहभागी होतील, त्याच्यासोबत हाच परिणाम होईल.

पत्रामध्ये पुढे लिहिले की, जे कुणी बाहेरील लोक मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना येथे कायम वास्तव्याची व्यवस्था करेल, अशी स्वप्ने पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा डोळे उघडणारा इशारा आहे. आता त्यासाठी जीवही गमवावा लागू शकतो, हे बाहेरील लोकांनी लक्षात ठेवावे. लक्षात ठेवा, विचार करा अन्यथा पुढचा नंबर तुमचा लागू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये टार्गेट किलींगच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगाममधील मोहनपोरामधील स्थानिक बँकेत तैनात विजय कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर मे महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची त्यांच्याच कार्यालयात घुसून हत्या केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद