जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार

By Admin | Updated: February 3, 2016 18:57 IST2016-02-03T18:31:27+5:302016-02-03T18:57:38+5:30

जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Tanzania's girl student complained to the police for rubbing clothes and shouting | जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार

जमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार

>
ऑनलाइन लोकमत
बंगऴुरु, दि. ३ -  संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.
बंगळुरूतील मेडिकल विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय टांझानियान विद्यार्थिंनीच्या गाडीचा गेल्या रविवारी उत्तर बंगऴुरुमधील गणपतीनगरमध्ये अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. या घटनेमुळे येथील संतप्त जमावाने या विद्यार्थिंनीसह तिच्यासोबत असलेल्या सहका-या मारहाण केली. तसेच, त्यांचे कपडेही फाडले आणि त्यांची गाडी पेटवून दिली. दरम्यान, या घटनेमुळे घाबरलेल्या या विद्यार्थिनीने जमावाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच टांझानियनच्या राजदूत कार्यालयाकडे मदत मागितली आहे. 

Web Title: Tanzania's girl student complained to the police for rubbing clothes and shouting