त्रिदंड स्वामी महाराज यांची जलपूजन यात्रा
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्रिदंड स्वामी महाराज यांचा खालसा औरंगाबादरोडवरील इंदू लॉन्स येथे आला असून, याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी दुपारी या खालशाच्या साधूंनी कपिला संगम येथे गोदाघाटावर जलपूजन यात्रा काढली होती. यावेळी वेदमंत्राच्या घोषात जलपूजन करण्यात आले.
त्रिदंड स्वामी महाराज यांची जलपूजन यात्रा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्रिदंड स्वामी महाराज यांचा खालसा औरंगाबादरोडवरील इंदू लॉन्स येथे आला असून, याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी दुपारी या खालशाच्या साधूंनी कपिला संगम येथे गोदाघाटावर जलपूजन यात्रा काढली होती. यावेळी वेदमंत्राच्या घोषात जलपूजन करण्यात आले.सिंहस्थ कुंभमेळ्यात त्रिदंड स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात कथाप्रवचन, सत्संग, होमहवन आदिंचा समावेश आहे. बिहारमधील भाविक आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत इंदू लॉन्स येथून मिरवणूक काढून कपिलासंगम येथील गोदाघाटावर वरुणदेवतापूजन व जलपूजन करण्यात आले. यावेळी स्तोत्र व आरती म्हणण्यात आली. त्यानंतर पुन्हा गोदावरीचे जल कलशांमध्ये भरून मिरवणूक खालशांमध्ये नेण्यात आली. (प्रतिनिधी)