शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सरकारी नोकरी मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर ​​​​​​​

By कुणाल गवाणकर | Published: November 02, 2020 1:30 PM

मुंबईतील बँकेत नोकरी लागल्यानंतर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

कन्याकुमारी: तामिळनाडूतल्या कन्याकुमारीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी नोकरी मिळाल्यामुळे तरुणानं आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या तरुणाला बऱ्याच महिन्यांपासून नोकरी नव्हती. त्यामुळे तो निराश होता. नोकरीसाठी प्रयत्न करूनही यश मिळत नसल्यानं त्यानं नवस केला होता.नोकरी मिळत नसल्यानं निराश झालेल्या तरुणानं शेवटचा उपाय म्हणून देवाकडे नवस केला. मला नोकरी मिळाल्यास आयुष्याचा त्याग करून तुला शरण येईन, असा नवस तरुणानं केला होता. नवस बोलल्यानंतर काही दिवसांतच तरुणाला मुंबईतल्या बँक ऑफ बदोडातल्या शाखेत नोकरी मिळाली. तो तिथे रुजू झाला. १५ दिवस त्यानं नोकरी केली. शुक्रवारी तो त्रिवेंद्रमसाठी निघाला. त्यावेळी त्यानं स्वत:ला रेल्वे रुळांवर झोकून दिलं आणि जीवन संपवलं.आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव नवीन असं असून तो कन्याकुमारी जिल्ह्यातल्या नागरकोईलचा रहिवासी आहे. नवीनच्या मृतदेहाशेजारी रेल्वे पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यामधून नवीनच्या आत्महत्येमागच्या कारणाचा उलगडा झाला. 'मला नोकरी मिळाल्यास देवाला शरण जाईन, असा नवस केला होता. त्यामुळे मी देवाकडे जात आहेत,' असा मजकूर नवीनच्या मृतदेहाशेजारील चिठ्ठीत आढळून आला. 

टॅग्स :Suicideआत्महत्या