शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

नेत्यांसाठी कलाकार उतरले मैदानात; प्रचारासाठी मागणी वाढली, सर्व पक्षांचा अभिनेत्यांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 08:16 IST

Tamil Nadu Lok Sabha Election 2024: तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत.

- असिफ कुरणेचेन्नई - तामिळनाडू राज्यातील ३९ जागांसाठी प्रचाराचे रण तापू लागले आहे. या वेळच्या निवडणुकीत राज्यात कलाकारांवर प्रचाराचा भार जास्त असेल, अशी चिन्हे आहेत. कमल हसन, आर. सरथकुमार, व्ही. चंद्रशेखर सारखे अभिनेते प्रचारात उतरणार आहेत. अभिनेता व द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे द्रमुकचे स्टार प्रचारक असून त्यांनी प्रचाराच्या दोन फेऱ्यादेखील पूर्ण केल्या आहेत.

भाजपने विरुदूनगर मतदारसंघातून अभिनेत्री राधिका यांना उमेदवारी दिली असून, त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्या टीव्ही मालिकांमधून तामिळ महिलांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होईल, असा पक्षाला विश्वास आहे. अभिनेता सरथकुमार व त्यांची पत्नी भाजपसाठी प्रचार करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते कमल हसन हे द्रमुक व त्यांच्या मित्रपक्षांसाठी (काँग्रेस वगळता) राज्यभरात प्रचार करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते व्ही. चंद्रशेखर देखील द्रमुकसाठी मैदानात असतील. दिग्दर्शक टी. राजेंद्र व कॉमेडियन सुरी देखील द्रमुकसाठी प्रचार करत आहेत. 

कलाकारांचा प्रभाव अधिकअण्णाद्रमुकने लोकसभेसाठी कलाकारांची यादी थोडी कमी केली असली तरी त्यांच्यासाठी अभिनेत्री विद्या यांच्यावर प्रचाराचा भार असेल.शेवटच्या टप्प्यात कलाकारांचा झंझावात आणखी वाढेल. तामिळी जनतेत कलाकारांचा जास्त प्रभाव असल्यामुळे सर्वच उमेदवार कलाकारांना प्रचारात आणत आहेत.

सर्वच मतदारसंघातून मागणी- राज्यातील सर्वच मतदारसंघांत प्रचार, रोड शो करण्यासाठी कलाकार, कॉमेडियन पाठवा अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. - सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची अभिनेत्यांसाठी आग्रही भूमिका आहे. - कलाकारांचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो. - त्यामुळे प्रचारात कलाकार हवाच, असा कार्यकर्त्यांचा नेत्यांकडे आग्रह आहे.

अभिनेता विजय प्रचारापासून लांबप्रसिद्ध तामिळ अभिनेता विजय याने आपला स्वत:चा पक्ष तामिळगा वेटरी कळघम (टीव्हीके) स्थापन केला असून २०२६ ची विधानसभा लढवणार आहे.लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष नसेल असे विजयने जाहीर केले आहे. तो लोकसभा प्रचारापासून लांब आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही संभ्रमात आहेत.

टॅग्स :Tamil Nadu Lok Sabha Election 2024तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल २०२४Dravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमBJPभाजपाcongressकाँग्रेस