तामिळनाडूत 'लेडी वीरप्पन'ची एन्ट्री! चंदन तस्कराची पत्नी आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 09:32 IST2026-04-12T09:30:48+5:302026-04-12T09:32:38+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: दोन दशकांपूर्वी चकमकीत मारला गेलेला चंदन तस्कर वीरप्पन यंदा तमिळनाडूच्या निवडणुकीत प्रचंड चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी व मुलगी विद्याराणी दोघीही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

Tamil Nadu Assembly Election 2026: 'Lady Veerappan' enters Tamil Nadu! | तामिळनाडूत 'लेडी वीरप्पन'ची एन्ट्री! चंदन तस्कराची पत्नी आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात

तामिळनाडूत 'लेडी वीरप्पन'ची एन्ट्री! चंदन तस्कराची पत्नी आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात

चेन्नई  - दोन दशकांपूर्वी चकमकीत मारला गेलेला चंदन तस्कर वीरप्पन यंदा तमिळनाडूच्या निवडणुकीत प्रचंड चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. वीरप्पनची पत्नी मुथुलक्ष्मी व मुलगी विद्याराणी दोघीही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

तमिलर काची पार्टीकडून वीरप्पनची ३५ वर्षीय पेशाने वकील असलेली मुलगी मेट्टूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तर तमिलगा वाझवुरिमाई काची पार्टीकडून पत्नी मुथुलक्ष्मी कृष्णागिरी मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत. 

हे दोन्ही पक्ष ‘तमिळ राष्ट्रवादाचे’  पुरस्कर्ते आहेत.२०२४ मध्ये मुथुलक्ष्मी यांनी लोकसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मते घेतली होती तर २००६ मध्ये त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होत्या.

‘वीरप्पन दुष्ट नव्हता’
वीरप्पन याची प्रतिमा सुधारून जनतेसमोर ती नव्याने मांडण्याचा या दोघींचा प्रयत्न असून वीरप्पन इतकाही दुष्ट गुन्हेगार नव्हता, असे विद्याराणीचे मत आहे. 
विद्याराणीचा प्रवास ‘पीएमके’ पक्षापासून सुरू झाला होता. राज्यात सुमारे १२ जिल्ह्यांत पसरलेल्या ‘वन्नियार’ समुदायाचा त्यांना पाठिंबा आहे. २०२० मध्ये भाजप व २०२४ मध्ये त्यांनी एनटीकेमध्ये प्रवेश केला होता.

Web Title : तमिलनाडु में 'लेडी वीरप्पन' की एंट्री, चंदन तस्कर की पत्नी-बेटी चुनाव में

Web Summary : वीरप्पन की पत्नी और बेटी तमिलनाडु चुनाव लड़ रही हैं। मुथुलक्ष्मी कृष्णागिरी से तमिलगा वाझवुरिमाई काची से, और विद्या रानी मेट्टूर से तमिलर काची से चुनाव लड़ेंगी। दोनों पार्टियां तमिल राष्ट्रवाद का समर्थन करती हैं। विद्या रानी वीरप्पन की छवि को सुधारना चाहती हैं, दावा है कि वह जघन्य अपराधी नहीं थे।

Web Title : Veerappan's Wife and Daughter Enter Tamil Nadu Elections, Stirring Controversy

Web Summary : Veerappan's wife and daughter are contesting Tamil Nadu elections. Muthulakshmi fights from Krishnagiri with Tamilga Vazhvurimai Katchi, and Vidya Rani from Mettur with Tamilar Katchi. Both parties champion Tamil nationalism. Vidya Rani aims to reshape Veerappan's image, claiming he wasn't a heinous criminal.