तामिळनाडूला केंद्राशी संघर्ष केल्यावर निधी कसा मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:29 IST2026-04-13T06:27:25+5:302026-04-13T06:29:08+5:30

Tamil Nadu Assembly Election 2026: अण्णा द्रमुकचे अध्यक्ष ई. के. पलानीस्वामी यांनी राज्याला निधी देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी द्रमुक सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारशी हा पक्ष मुद्दाम संघर्ष करत असताना राज्य सरकारला निधी कसा मिळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

Tamil Nadu Assembly Election 2026: How will Tamil Nadu get funds after fighting with the Centre? | तामिळनाडूला केंद्राशी संघर्ष केल्यावर निधी कसा मिळेल

तामिळनाडूला केंद्राशी संघर्ष केल्यावर निधी कसा मिळेल

तंजावर (तामिळनाडू) : अण्णा द्रमुकचे अध्यक्ष ई. के. पलानीस्वामी यांनी राज्याला निधी देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी द्रमुक सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारशी हा पक्ष मुद्दाम संघर्ष करत असताना राज्य सरकारला निधी कसा मिळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) एक घटक पक्ष असलेल्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे (एएमएमके) सरचिटणीस टी. टी. व्ही. दिनकरन यांच्यासोबत संयुक्त प्रचारसभेत बोलताना पलानीस्वामी शनिवारी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये मतभेद असू शकतात किंवा ते एकमेकांवर टीका करू शकतात; परंतु निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सरकारने जनतेची सेवा केली पाहिजे.

द्रमुक निधीबाबत अपयशी
राज्य सरकार जर जाणूनबुजून भाजपवर टीका करीत असेल तर तामिळनाडूला निधी कसा मिळेल? केंद्रात काँग्रेससोबत सत्तेत असतानासुद्धा द्रमुकला आवश्यक निधी मिळाला नव्हता.
आता केंद्राशी सलोख्याचे संबंध राखण्यात अपयशी ठरल्यानंतर ते भाजपवर टीका करत आहेत, अशी टीका पलानीस्वामी यांनी केली.

Web Title : तमिलनाडु का धन संकट: पलानीस्वामी ने केंद्र से DMK के संघर्ष पर उठाए सवाल

Web Summary : पलानीस्वामी ने DMK पर केंद्र सरकार के साथ दुश्मनी करके तमिलनाडु के धन को खतरे में डालने का आरोप लगाया। उन्होंने सवाल किया कि अगर सत्तारूढ़ दल जानबूझकर भाजपा से भिड़ता है तो राज्य को धन कैसे मिलेगा, और कांग्रेस के साथ गठबंधन के दौरान भी धन की कमी को उजागर किया।

Web Title : Tamil Nadu's Funding Woes: Palaniswami Questions DMK's Conflict with Centre

Web Summary : EPS criticizes DMK for jeopardizing Tamil Nadu's funding by antagonizing the central government. He questions how the state will receive funds if the ruling party deliberately clashes with the BJP, highlighting past funding struggles even when DMK was allied with Congress.