सेक्स रॅकेटमध्ये तामिळ अभिनेत्री, पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 02:06 IST2018-06-05T02:06:49+5:302018-06-05T02:06:49+5:30

चेन्नईतील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणात एका तामिळ अभिनेत्रीला अटक केली आहे. तेथून आणखी तिघी जणींची सुटका करण्यात आली असून, त्याही टीव्ही मालिका व तामिळ चित्रपटांशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

 Tamil actress, police arrested for sex racket | सेक्स रॅकेटमध्ये तामिळ अभिनेत्री, पोलिसांनी केली अटक

सेक्स रॅकेटमध्ये तामिळ अभिनेत्री, पोलिसांनी केली अटक

चेन्नई : चेन्नईतील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणात एका तामिळ अभिनेत्रीला अटक केली आहे. तेथून आणखी तिघी जणींची सुटका करण्यात आली असून, त्याही टीव्ही मालिका व तामिळ चित्रपटांशी संबंधित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
अभिनेत्री संगीता तिचा सहकारी सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईजवळील पानयुरमधील एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये हा व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा घातला. संगीताला पाहून पोलिसांना धक्काच बसला. ही अभिनेत्री १९९६ पासून अनेक तामिळ टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. अन्य काही अभिनेत्रीही या रॅकेटमध्ये सहभागी असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे.
संगीताखेरीज आणखी ज्या तीन अभिनेत्री तिथे होत्या, त्या चित्रपटात व मालिकांत लहानसहान भूमिका करीत असत. टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन, त्यांना या व्यवसायात आणले गेले की पैशासाठी त्या स्वत: तिथे आल्या, याची चौकशी पोलीस करीत आहेत. त्या तिघींनी महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Tamil actress, police arrested for sex racket

टॅग्स :Arrestअटक