शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानसोबत होऊ शकते चर्चा, भारताने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 20:02 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, पण दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा नक्कीच पुढे नेता येईल, असे भारताने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट झाल्याच्या वृत्तालाही भारताकडून दुजोरा देण्यात आला आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजुआ यांची भेट २६ डिसेंबर रोजी बँकॉक  येथे झाली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत मौन पाळले होते.  भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, "चर्चा आणि दहशतवाद एकत्रपणे चालू शकत नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. पण अशी काही माध्यमे आहेत ज्यांच्याद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा सुरू असते. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये चर्चा होत असते. त्याचपद्धतीने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली होती. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे आम्ही सांगत असलो तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा निश्चितपणे पुढे जाऊ शकते." डोवाल आणि त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची संक्षिप्त माहितीसुद्ध रवीश कुमार यांनी यावेळी दिली. " या चर्चेवेळी भारताकडून सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच ही चर्चा केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहिली. दहशतवादाच्या झळा संपूर्ण देशाला बसू नयेत हे निश्चित करण्याला आमचे प्राधान्य आहे." भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी पाकिस्तानच्या कारागृहामध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट घडवून आणण्यात आली होती. मात्र या मुलाखतीदरम्यान पाकिस्तानने  कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला दिलेल्या वागणुकीला भारताने अपमानास्पद मानले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जाधव यांच्या परिवारासोबत जे काही घडले ती त्यावेळची घटना होती. मात्र द्विपक्षीय चर्चेची तारीख त्याआधीच निश्चित झाली होती.  मात्र दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये अशा प्रकारची चर्चा कधी होईल याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद