तालिबानी सुडाने पाकिस्तान हादरले

By Admin | Updated: June 10, 2014 01:56 IST2014-06-10T01:56:27+5:302014-06-10T01:56:27+5:30

पाकिस्तानला हादरवून सोडणा:या कराची विमानतळावरील दहशतवादी हल्ल्याचे नाटय़ तब्बल 13 तासांच्या धुमश्चक्रीनंतर सोमवारी दुपारी संपले. त्यात 1क् दहशतवाद्यांसह 28 जण ठार झाले.

Talibani sudane shakes Pakistan | तालिबानी सुडाने पाकिस्तान हादरले

तालिबानी सुडाने पाकिस्तान हादरले

>13 तासांचे नाटय़ : कराची विमानतळावरील हल्ल्यात 1क् अतिरेक्यांसह 28 ठार
कराची : पाकिस्तानला हादरवून सोडणा:या कराची विमानतळावरील दहशतवादी हल्ल्याचे नाटय़ तब्बल 13 तासांच्या धुमश्चक्रीनंतर सोमवारी दुपारी संपले. त्यात 1क् दहशतवाद्यांसह 28 जण ठार झाले. जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मध्यरात्री केलेल्या या हल्ल्याची तेहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. 
कराची विमानतळावरील हल्ला म्हणजे ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले करून निष्पाप लोकांचे बळी घेणा:यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही अजून जिंवत असल्याचा इशारा आम्ही सरकारला दिल्याचे तालिबानचा प्रवक्ता शाहिदुल्ला शाहिद याने निवेदनात म्हटले आहे. तालिबानचा माजी प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याचा अमेरिकी ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठीही आम्ही हा हल्ला केल्याचे शाहिद याने स्पष्ट केले. शेकडो मुलाबाळांच्या हत्येचा बदला घेणो बाकी असल्याची धमकीही शाहिद याने दिली.
दहा दहशतवाद्यांनी दोन गटांत 
विभागून विमानतळावर हल्ला केला. त्यानंतर त्यांची पाकिस्तानी सैन्यदलाचे जवान, निमलष्करी दल, पोलीस व विमानतळ सुरक्षा दलासोबत तब्बल 13 तास धुमश्चक्री सुरू होती. (वृत्तसंस्था)
 
हाफिजची उलटी बोंब! 
कराची विमानतळावरील हल्ला हे भारताचे पाकिस्तानविरुद्धचे युद्धसदृश कृत्य आहे. त्यामागे नरेंद्र मोदींची नवी सुरक्षा टीम आहे. भारतातील हिंदुत्ववादी सरकारच्या पाक सरकारने केलेल्या खुशमस्करीचा हा थेट परिणाम आहे, असे टि¦ट जमात उद दवाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदने केले आहे.
 
आत्मघाती दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे ग्रेनेड, रॉकेट लाँचर्स, पेट्रोलबॉम्ब आदी आधुनिक शस्त्रेही होती. सरकारी वृत्तानुसार, मृतांत विमानतळ सुरक्षा दलाचे 11 कर्मचारी, 1 पोलीस अधिकारी आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या 4 अधिका:यांचा समावेश आहे.
 
भारतातही अतिदक्षता 
कराची हल्ल्यानंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढविल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
 
विमान अपहरणाचा प्रयत्न 
मुख्य टर्मिनलवरील प्रवासी विमानाचे अपहरण करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता; मात्र तो निष्फळ ठरला.

Web Title: Talibani sudane shakes Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.