Corona Vaccine: दोन्ही डोस घेतले, तर रुग्णालयात जाणे टळेल; प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमीच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:39 AM2021-06-14T05:39:05+5:302021-06-14T07:26:46+5:30

अभ्यासाचा निष्कर्ष : विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास या संसर्गापासून ६५ टक्के संरक्षण मिळते.

Taking both doses of corona vaccine will avoid going to the hospital | Corona Vaccine: दोन्ही डोस घेतले, तर रुग्णालयात जाणे टळेल; प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमीच

Corona Vaccine: दोन्ही डोस घेतले, तर रुग्णालयात जाणे टळेल; प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमीच

Next

चेन्नई : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज ७७ टक्क्यांनी व प्रकृती गंभीर होऊन आयसीयूमध्ये हलविले जाण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांनी कमी होते. हा निष्कर्ष तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी महाविद्यालयाने केलेल्या एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.

विविध रुग्णालयांतील हजार आरोग्यसेवकांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास या संसर्गापासून ६५ टक्के संरक्षण मिळते. कोविशिल्ड या लसीच्या एका डोसनेही शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज ९० टक्क्यांनी कमी होते असे या अभ्यासात दिसून आले.  देशामध्ये कोरोना लसींचा अजूनही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र सरकारने वाढविले, असा आरोप काही वैद्यकीय तज्ज्ञांनी केला होता. सध्या लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुतनिक-व्ही या तीन लसी देण्यात येतात.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या प्रकारच्या विषाणूंमुळे संसर्गाचे प्रमाण खूप वाढले. 

लसींचे अनेक पर्याय
विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसी मागविण्याची तयारी केंद्राने सुरू केली आहे. त्यासाठी मॉडर्ना, फायझरसारख्या कंपन्यांशी केंद्र सरकार चर्चा करीत आहे. लसींचे अनेक पर्याय उपलब्ध झाले तर लसीकरणालाही वेग येईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांना वाटते. 

Web Title: Taking both doses of corona vaccine will avoid going to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.