अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा
By Admin | Updated: January 14, 2017 00:06 IST2017-01-14T00:06:27+5:302017-01-14T00:06:27+5:30
वडणगे : भिलवडी (ता. पलूस) येथील माळवाडीतील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला असून, संशयित नराधमांना ताबडतोब अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समिती कोल्हापूर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांना देण्यात आले.

अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा
व णगे : भिलवडी (ता. पलूस) येथील माळवाडीतील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला असून, संशयित नराधमांना ताबडतोब अटक करावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समिती कोल्हापूर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ज्या नराधमांनी हे कृत्य केले, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. झालेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून, पोलिसांनी या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करावा. संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांनी जलदगतीने तपास करावा. तसेच सदरचा खटलाही जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आनंदराव पवळ, जिल्हाध्यक्ष शामराव पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष आनंदराव सुतार, जिल्हा सरचिटणीस संजय पोवार, मधुकर दुधाणे, जयसिंग टिकले, सतीश फेगडे, ज्ञानदेव तोडकर, संजय भोसले, निवास चव्हाण, रामचंद्र किडगावकर, महादेव पोवार, आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो ओळ : कोल्हापूर जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांना निवेदन देताना भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते.फोटो इ मेल