ओवेसींवर देशद्रोहाचा खटला भरा

By Admin | Updated: July 4, 2016 05:57 IST2016-07-04T05:57:59+5:302016-07-04T05:57:59+5:30

आॅल इंडिया मुस्लिम इत्तेहादुल मुस्लमिनचे (एआयएमआयएम) प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींवर देशद्रोहाचा खटला दाखल करा

Take a sedition case against the Owaisi | ओवेसींवर देशद्रोहाचा खटला भरा

ओवेसींवर देशद्रोहाचा खटला भरा


मेरठ/ नवी दिल्ली/ हैदराबाद : आॅल इंडिया मुस्लिम इत्तेहादुल मुस्लमिनचे (एआयएमआयएम) प्रमुख व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका मेरठच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल झाली आहे. उत्तर प्रदेश वकील परिषदेचे सदस्य अनिलकुमार बक्षी यांनी ही याचिका मी दाखल केल्याचे रविवारी सांगितले. याचिकेवर ६ जुलै रोजी सुनावणी होईल.
भाजप व जनता दलनेही (यू) रविवारी ओवेसी यांच्यावर कारवाईची व त्यांना अटक करण्याची माागणी केली. इसिससाठी काम करीत असल्याच्या संशयावरून एनआयएने पकडलेल्या पाच मुस्लिम तरुणांना आमचा पक्ष कायदेशीर मदत उपलब्ध करून देईल, असे शुक्रवारी ओवेसी म्हणाले होते. तेलंगणचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ओवेसी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Take a sedition case against the Owaisi