पाण्यासाठी आज रास्तारोको टाकळ
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:12+5:302015-08-28T23:37:12+5:30
ीभान: आश्वासन देऊनही चारी बंदच

पाण्यासाठी आज रास्तारोको टाकळ
ी ान: आश्वासन देऊनही चारी बंदचटाकळीभान: जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी टाकळीभान येथील चारी क्रमांक १६ ला पाणी सोडण्याचे आश्वासन लाभधारक शेतकर्यांना गुरूवारी देऊनही पाणी न सोडल्याने शनिवार २९ ऑगस्टला नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. चारी क्रमांक १६ वरील लाभधारक शेतकर्यांनी वडाळा पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता दत्तात्रय खोसे यांना याबाबत निवेदन दिले. यापूर्वी रास्तारोकोचा इशारा दिल्यानंतर पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारचा रास्तारोको रद्द करण्यात आला. पण अधिकार्यांनी आश्वासन देऊनही पाणी सोडल्यामुळे शनिवार २९ ऑगस्टला रास्तारोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. त्यावर अशोक कारखान्याचे संचालक बापूराव त्रिभुवन, ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे, गणेश कोकणे, सुनील बोडखे, सचिन बोडखे, मच्छिंद्र कोकणे, अशोक पवार, अजय पटारे,गोरक्षनाथ पटारे, नवनाथ खंडागळे, प्रसाद बोडखे, रघू शिंदे आदींची नावे आहेत. (वार्ताहर)