श्रीलंकेविरोधात ठाम भूमिका घ्या - जयललिता
By Admin | Updated: June 1, 2014 18:14 IST2014-06-01T18:14:23+5:302014-06-01T18:14:54+5:30
भारतीय मच्छिमारांना अटक करणा-या श्रीलंकेविरोधात भारताने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांनी नरेंद्र मोदींकडे केली आहे.

श्रीलंकेविरोधात ठाम भूमिका घ्या - जयललिता
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि.१ - भारतीय मच्छिमारांना अटक करणा-या श्रीलंकेविरोधात भारताने कठोर भूमिका घेत या घटनेचा तीव्र निषेध करावा. तसेच या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिला यांनी नरेंद्र मोदींकडे केली आहे.
रविवारी श्रीलंकेच्या नौदलाने २९ भारतीय मच्छिमारांना अटक केल्याचे उघड झाल्यावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवले आहे. 'भारताने श्रीलंकेच्या नौदलाच्या या दादागिरीविरोधात कठोर शब्दात निषेध करावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. पाल्क बे हा भाग भारतीय मच्छिमारांचा पारंपारिक भाग असून हा मासेमारीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. पण श्रीलंकेचे नौदल दररोज या भागात जाणा-या भारतीय मच्छिमारांवर दादागिरी करत त्यांना हुसकावून लावतात. यूपीए सरकराच्या कचखाऊ धोरणामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. पण नव्याने आलेल्या एनडीए सरकारकडून आम्हाला या विषयावर तोडगा मिळेल अशी आशा जयललिता यांनी वर्तवली आहे. मच्छिमारांसह केंद्र सरकारने डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय मागे घेत डिझेल, पेट्रोलच्या दर पुन्हा स्वतःच्या नियंत्रणाखाली आणावे अशी मागणीही जयललिता यांनी केली आहे.