सरोळीचा ग्रामसेवक लाच घेत्

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:18+5:302014-12-12T23:49:18+5:30

ााना जाळ्यात

Take the bribe of Saroli Gramsevak | सरोळीचा ग्रामसेवक लाच घेत्

सरोळीचा ग्रामसेवक लाच घेत्

ना जाळ्यात
* गंगाराम आंबी : १२१२२०१४-गड-०९
अडकूर :
नळपाणी पुरवठा योजनेतील साहित्य पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी सरोळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामसेवक महादेव गंगाराम आंबी (सध्या रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) याला ५००० रुपयांची लाच घेताना आज, शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अडकूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, वसंत मायाप्पा पाटील (वय ४६, रा. सरोळी, ता. गडहिंग्लज) यांचे अडकूर येथे वैभव सेल्स नावाने पीव्हीसी पाईप व मोटर खरेदी-विक्रीचे दुकान आहे. १३ व्या वित्त आयोगातून मंजूर नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीने सव्वा लाखाला त्यांच्याकडून खरेदी केले होते. त्यापैकी पाटील यांना देय असलेल्या १४९०० रुपयांसाठी आंबी यांनी ५००० रुपयांची मागणी केली. दीड वर्षे झाले तरी पैसे दिले नाहीत म्हणून या घटनेची तक्रार वसंत पाटील यांनी कोल्हापूरच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती.
दरम्यान, आज दुपारी चारच्या सुमारास पाटील यांच्या वैभव सेल्स दुकानात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस हवालदार मनोहर खणगावकर, श्रीधर सावंत, अमर भोसले, मनोज खोत, दयानंद कडूकर यांच्या पथकाने सापळा रचून आंबी याला रंगेहात पकडले. (वार्ताहर)

Web Title: Take the bribe of Saroli Gramsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.