शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यावर काहीही कारवाई करा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार; राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:08 IST

भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात घातल्याचा आरोप 

नवी दिल्ली : "माझ्यावर सरकार गुन्हा दाखल करो किंवा विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतच राहणार," असे ठाम प्रतिपादन लोकसभेतील  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. 

राहुल यांनी 'एक्स' व त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर व्हिडिओ जारी करत म्हटले, ''कोणताही असा व्यापार करार जो शेतकऱ्यांची उपजीविका हिरावून घेईल वा देशाची अन्नसुरक्षा कमकुवत करेल, तो शेतकरी-विरोधी आहे. शेतकरीविरोधी सरकारलाअन्नदात्यांच्या हिताशी तडजोड करू देणार नाही.''   राहुल गांधी यांनी पंतप्रधान केंद्र सरकारवर आरोप करत, भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे शेतकऱ्यांची उपजीविका आणि देशाची अन्नसुरक्षा धोक्यात घातली जात असल्याचा दावा केला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आता रस्त्यापासून संसदेपर्यंत लढा उभारणार आहेत.

भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात विरोधकांची संसद परिसरात निदर्शनेभारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावर गुरुवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करत केंद्र सरकारचा निषेध केला. हा करार करताना केंद्र सरकारने अमेरिकेसमोर समर्पण केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला. यावेळी खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या मकर द्वाराजवळ झालेल्या निदर्शनात काँग्रेसचे, द्रमुकचे, सपाचे, सीपीआय-एमएलच्या खासदारांसह विरोधी पक्षाचे अनेक खासदार सहभागी झाले होते. 

राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा, निशिकांत दुबे यांची मागणीलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे व त्यांना आयुष्यभर निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे, या मागणीसाठी त्यांच्या विरोधात आपण मूलभूत प्रस्ताव  मांडण्यासाठी नोटीस दिल्याची माहिती भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी दिली. राहुल गांधी सोरोस फाउंडेशन, यूएसएआयडी, फोर्ड फाउंडेशनशी हातमिळवणी करून परदेशात जातात, भारतविरोधी शक्तींशी संगनमत करतात, असे या नोटिशीत दुबे यांनी म्हटले आहे. 

'फाशी जाण्यासही तयार आहोत'राहुल गांधी यांच्याविरोधात दुबे यांनी मूलभूत प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आम्हाला कोणत्याही प्रस्तावांची भीती नाही. फाशी द्यायची असेल तरी आम्ही त्यासाठीही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून आम्हाला न्याय मिळत नाही. त्यामुळेच आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची नोटीस दिल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ready to face action, will fight for farmers: Rahul Gandhi

Web Summary : Rahul Gandhi vows to continue fighting for farmers, even if facing government action. He accuses the government of jeopardizing farmers' livelihoods via trade deals, leading to protests and demands for his disqualification from parliament. Congress remains defiant.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा