मैत्रिपूर्ण संबंधांचा फायदा घेऊन पंचवीस लाखांना गंडा
By Admin | Updated: March 21, 2015 00:06 IST2015-03-20T22:40:05+5:302015-03-21T00:06:41+5:30
नाशिक : कुटुंबीयांशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांचा गैरफायदा घेत एकाने २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, भाभानगर येथे राहणार्या शमा आनंद विशाल यांच्या परिवारासोबत संशयित नईम उस्मान शेख यांचे घरोब्याचे संबंध होते़ या संबंधाचा फायदा घेत शेखने बांधकाम व्यावसायिक असल्याचे भासवून ५ जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीत २५ लाख ६० हजार रुपये उसनवार नेले़ मात्र ठरल्यानुसार ही रक्कम परत न केल्याने शमा विशाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित नईम शेखविरोधात फिर्याद दिली असून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)