दोषींवर कारवाई करा
By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30
राज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमारे यांनी केली आहे़

दोषींवर कारवाई करा
र ज्यात दलित समाजावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून जवळपास ७० टक्केहून अधिक ठिकाणी दलितांना प्रवेश नाकारला जातो़ समाजातील अशा प्रवृत्तीच्या विरोधात ॲट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी अशी मागणी भीमसेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद वाघमारे यांनी केली आहे़शासन निर्णयाची अंमलबजावणी कराराज्यात वेगवेगळ्या जिल्ात अनेक वर्षापासून नांदेड जिल्ातील शिक्षक सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत़ बाहेर जिल्ात नोकरी करणार्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून स्वताहाच्या जिल्ात परत येण्याची तरतूद २९ सप्टेंबर २०११ च्या आदेशात करण्यात आली असून या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे़सेवाज्येष्ठता यादीत २०१४ ते २०१५ मध्ये बदली होवून नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या शिक्षकांची नावे अद्यापही आहेत़ ती नावे यादीतून वगळण्यात यावीत़ अट शिथील असणारे व नसणारे अशी स्वतंत्र यादी तयार करावी़ अनेक शिक्षक इतरही जि़प़कडे बदली करुन रूजू झालेले आहेत़ अशा शिक्षकांमुळे इतर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होत असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आले़ यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दुगाणे, उपाध्यक्ष गोविंद जायभाये, प्रताप देशमुख, हणमंत जोगपेठे, संदीप डोंगरे यांची उपस्थिती होती़ तंबाखू मुक्त परिसरभारतीय दंत परिषदेच्या वतीने तंबाखू मुक्त परिसर या फलकाचे महापौर शैलजा स्वामी यांचा अध्यक्षतेखाली अनावरण करण्यात आले़ यावेळी आ़डी़पी़सावंत, आयुक्त सुशील खोडवेकर, मसूद खान, किशोर स्वामी, बी़आऱकदम, आनंद चव्हाण, अनुजा तेहरा यांची उपस्थिती होती़दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ़अरुण निवळे पाटील म्हणाले, तंबाखू मुक्त परिसराचे हे स्टिकर शहरातील रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, गुरुद्वारा परिसर, उद्यान आदी ठिकाणी लावण्यात येणार आहेत़ कार्यक्रमाला डॉ़विनोद केजकर, डॉ़दिनेश चव्हाण, डॉ़सुरेश दागडीया, डॉ़प्रविण गिल्डा, डॉ़भावना भगत, डॉ़मेघा उम्रजकर, डॉ़अनुपता नळदकर, डॉ़बरगले, डॉ़अविनाश पाळेकर, डॉ़सागर राहेगांवकर, डॉ़सागर मापारे यांची उपस्थिती होती़