शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यार्पणानंतर दहशतवादी तहव्वुर राणाचा पहिला फोटो समोर, NIA न्यायालयात हजर केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:58 IST

Tahawwur Rana Extradition: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात आले.

Tahawwur Rana Extradition: 26/11 मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा(वय 64) याला गुरुवारी (10 एप्रिल 2025) भारतात आणण्यात आले. एनआयएच्या पथकाने तहव्वूरला अमेरिकेतून दिल्लीला एका विशेष विमानाने आणले. दरम्यान, भारतात दाखल झालेल्या तहव्वुर राणाचा एक फोटो समोर आला आहे. राणाचा हा पाठमोरा फोटो असून, यात त्याचे पांढरे झालेले केस आणि अंगावर चॉकलेटी रंगाचे कपडे दिसत आहेत. 

पटियाला हाऊस कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्थामुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालय परिसरात सीआयएसएफसह निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

राणाला तिहार तुरुंगात ठेवले जाणारतहव्वुर राणाला तिहार तुरुंग ठेवले जाणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, राणाला तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा (एलईटी), हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

विशेष एनआयए न्यायालयात खटला चालणारदिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याने, राणाला मुंबईत पाठवले जाणार नाही. या हाय-प्रोफाइल प्रकरणात भारताच्या वतीने वरिष्ठ वकील दयान कृष्णन हे खटला चालवतील. त्यांच्यासोबत विशेष सरकारी वकील (एसपीपी) नरेंद्र मान हे कायदेशीर कार्यवाहीचे नेतृत्व करतील.

पाकिस्तानची हात झटकलेतहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने गुरुवारी स्पष्ट केले. पाकिस्तानने म्हटले की, तहव्वुर राणा हा कॅनेडियन नागरिक आहे. त्याने जवळजवळ दोन दशकांपासून त्याचे पाकिस्तानी कागदपत्रे अपडेट केलेली नाहीत. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीAmericaअमेरिकाIndiaभारतdelhiदिल्लीMumbaiमुंबई