तायवाडे यांचा अर्ज दाखल
By Admin | Updated: June 2, 2014 23:43 IST2014-06-02T23:43:55+5:302014-06-02T23:43:55+5:30

तायवाडे यांचा अर्ज दाखल
>फोटो- विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना डॉ. बबनराव तायवाडे, सोबत अनंतराव घारड, विकास ठाकरे, जयप्रकाश गुप्ता, प्रफुल्ल गुडधे. पदवीधर निवडणूक : काँग्रेस लागली कामाला विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं तसेच शिक्षक, कर्मचारी कामगार संघटनांचे अधिकृत उमेदवार डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी दुपारी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. गेल्यावेळी भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात तायवाडे यांनी ही निवडणूक लढविली होती. त्यावेळी गडकरींनी बाजी मारली. यावेळी गडकरी रिंगणात नाहीत. अर्ज दाखल करण्यापूर्वी तायवाडे यांनी महाराजबाग परिसरातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला तसेच संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर मिरवणुकीने विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला. या वेळी नासुप्रचे विश्वस्त अनंतराव घारड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, अभिजित वंजारी, गिरीश पांडव, विनोद गावंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर पंजाबराव देशमुख स्मृती भवन, काँग्रेसनगर येथे सभा झाली. या वेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, या वेळी तायवाडे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. संपूर्ण पक्ष ताकदीने तायवाडे यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकार्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही निवडणूक पराभवाचा डाग पुसून काढेल व काँग्रेसला नवसंजीवनी देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोट...गेल्या अनेक वर्षांपासून आपण शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करताना विविध प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. शिक्षक, कर्मचारी व कामगार संघटनांसह या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे. आपण केलेल्या कामाची पावती या वेळी आपल्याला नक्कीच मिळेल,याची खात्री आहे.- डॉ. बबनराव तायवाडे काँग्रेस उमेदवार