India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

By ravalnath.patil | Published: September 27, 2020 03:24 PM2020-09-27T15:24:04+5:302020-09-27T15:42:13+5:30

भारतीय लष्कराने रविवारी लेहपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पूर्व लडाखच्या चुमर डेमचोक भागात टँक आणि वाहने तैनात केली आहेत.

t-90 and t-72 tanks are deployed in ladakh by india indian soldiers will teach lessons to enemies even in 40 degrees | India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

Next

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरु आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमधील लष्करी कमांडर स्तरावर अनेक बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, चीनने अद्याप नियंत्रण रेषेवरून मागे हटण्यास तयारी दर्शविली नाही.

चीनच्या या आडमुठीपणामुळे भारताने आता सीमेवरील आपली बाजू बळकट करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय लष्कराने रविवारी लेहपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या पूर्व लडाखच्या चुमर डेमचोक भागात टँक आणि वाहने तैनात केली आहेत.

भारतीय लष्कराने एलएसीजवळील चुमार-डेमचोक भागात बीएमपी -२ इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांसह टी -९० आणि टी -७२ टँक तैनात केले आहे. या टँकचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्व लडाखमधील शत्रूवर उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात हल्ला करू शकतात.

फायर अँड फ्युरी भारतीय लष्काराचे एकमेव स्थापित करण्यात आले आहे. जगभरातील देशांच्या अशा कठीण भागात यंत्रसामुग्री दलांना तैनात केले आहे, असे एलएसीवर टी -९० आणि टी-७२ टँक तैनात केल्यानंतर १४ कोर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले.

याचबरोबर, चीनसोबत सुरू असलेल्या तणावाबाबत अरविंद कपूर यांनी भाष्य केले. यावेळी दल आणि उपकरणांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी जवान आणि मशीन या दोघांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, असे अरविंद कपूर यांनी सांगितले. दरम्यान, या भागात टँक, लढाऊ वाहने व अवजड तोफा तैनात करणे एक आव्हान आहे.

टी-९० भीष्म टँकमध्ये तीन प्रकारचे इंधन
पूर्व लडाखच्या चुमार-डेमचोक भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे टी-९० भीष्म टँक तैनात करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत येथील तापमान ऋण असते. अशा परिस्थितीत या टँकमध्ये तीन प्रकारचे इंधन वापरले जाते. जेणेकरून हिवाळ्यामध्ये ते गोठू नये.
 

आणखी बातम्या...

Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

-  सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती     

- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"    

- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु        

Web Title: t-90 and t-72 tanks are deployed in ladakh by india indian soldiers will teach lessons to enemies even in 40 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.