शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:59 IST

Haryana Government Oath Ceremony :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत.

Haryana Government Oath Ceremony : हरयाणा सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवारी (१५ ऑक्टोबर) हरयाणामध्ये होणार आहे. हा शपथविधी सोहळा पंचकुला सेक्टर ५ च्या परेड ग्राऊंडवर आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही यात सहभागी होणार आहेत.

शपथविधी सोहळ्यासाठी परेड ग्राऊंडमध्ये एक लाख लोकांच्या आसनक्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय, देशातील उद्योगपती आणि बड्या व्यक्तींनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.

'हे' नेते मंत्री होण्याची शक्यतामुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याशिवाय १२ नेते मंगळवारी (15 ऑक्टोबर) मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. अनिल विज, कृष्णा बेदी, कृष्णलाल पनवार, अरविंद शर्मा, कृष्णा मिड्डा, महिपाल ढांडा, मूलचंद शर्मा, लक्ष्मण यादव, राव नरबीर, सुनील संगवान, बिपुल गोयल, तेजपाल तन्वर यांना हरयाणाच्या नवीन सैनी सरकारमध्ये मंत्री केले जाऊ शकते.

नायब सिंह सैनी यांनी घेतली होती भाजप नेत्यांची भेट विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर हरयाणातील नवीन सरकारचे प्रमुख म्हणून संभाव्य शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. 

निवडणुकीत भाजपची सर्वोत्तम कामगिरीदरम्यान, भाजपने हरयाणा विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे, जी काँग्रेसच्या जागांच्या संख्येपेक्षा ११ जास्त आहे. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, या निवडणुकीत जेजेपी आणि आपचा सफाया झाला आणि आयएनएलडीला केवळ दोन जागा जिंकण्यात यश आले.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी