स्वाती मालीवाल यांचा जीव धोक्यात, पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 08:49 IST2024-05-16T08:48:44+5:302024-05-16T08:49:00+5:30

‘आप’चे नेते संजय सिंह यांनी स्वाती यांची घेतली भेट

swati maliwal life in danger | स्वाती मालीवाल यांचा जीव धोक्यात, पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा

स्वाती मालीवाल यांचा जीव धोक्यात, पूर्वाश्रमीच्या पतीचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांनी कोणाच्या सांगण्यावरून मालीवाल यांच्याशी अभद्रता केली, असा प्रश्न मालीवाल यांचे पूर्वाश्रमीचे पती नवीन जयहिंद यांनी केला. मालीवाल यांचा जीव धोक्यात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 

 दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीनंतर राज्यसभेच्या सदस्य स्वाती मालीवाल बेपत्ता झाल्याची आवई उठली असतानाच आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून मालीवाल सार्वजनिकपणे कुठेच दिसल्या नसल्यामुळे त्यांना ‘आप’ने भूमिगत केले काय, असा सवाल भाजप नेते करीत होते. संजय सिंह यांनी दिल्ली महिला आयोगाच्या सदस्य वंदना सिंह यांच्यासोबत जाऊन दुपारी मालीवाल यांची भेट घेऊन या उलटसुलट चर्चांना विराम दिला. 


 

Web Title: swati maliwal life in danger