शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलच्या किंमतीवरून 'राम-रावण'!; 'या' ज्येष्ठ खासदाराकडून मोदींना घरचा आहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:44 IST

सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेवर पार पाणी फेरले गेले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देसर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती.सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.याच मुद्द्यावर आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - कोरोना संकटात इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरांसंदर्भात अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेवर पार पाणी फेरले गेले आहे. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. याच मुद्द्यावर आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. स्वामी यांनी हा निशाणा साधताना थेट प्रभू रामचंद्र, माता सीता आणि रावणाचा उल्लेख केला आहे.

सुब्रमण्यम स्वामी, हे भाजपचे खासदार आहेत. असे असतानाही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची तुलना थेट श्रीराम, रावण आणि माता सीता यांच्या जन्मस्थळांसोबतच केली आहे. प्रभू श्री रामांच्या भारतात पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचे दाखवत, शेजारील नेपाळ आणि श्रीलंकेत ते दर अत्यंत कमी असल्याचे स्वामींनी म्हटले आहे. 

'कृषी सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही'

सुब्रमन्यम स्वामींनी केलं असं ट्विट -रामाच्या भारतात पेट्रोलचा दर 93 रुपये प्रति लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचा दर 53 रुपये प्रति लिटर, तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचा दर 51 रुपये प्रति लिटर, असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Budget 2021, Automobile sector: मोठी बातमी! डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस; महागाईचा भडका उडणार?

'कृषी सेसमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही' - सध्या मुंबईत पेट्रोल 92.86 आणि डिझेल 83.30 रुपयांना लीटर आहे. यावर हा सेस लागणार नसून तो कंपन्यांच्या ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर लागणार आहे. यामुळे हा सेस कंपन्यांना द्यावा लागणार आहे. या दरवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार नाही, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. सोशल मीडियावर आणि काही पोर्टलने वृत्त दिले होते, की पेट्रोल व डिझेलच्या किंमती 2.5 ते 4 रुपयांनी वाढणार आहेत. मात्र, जावडेकर यांनी हे वृत्त फेटाळले आहे.  तसेच, केवळ टॅक्सला पुन्हा नियोजित करण्यात आले आहे, सरकारने एक्साईज कमी केला असून कृषी सेस नव्याने सुरू केला आहे. त्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नाही, ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, असे जावडेकर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकारbudget 2021बजेट 2021