स्वामी चिदानंद सरस्वती करणार गोदा स्वच्छता जनजागृती गंगा ॲक्शन परिवार : स्वच्छता दिवस पाळण्यासाठी नियोजन
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उत्तराखंड ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष गंगा ॲक्शन परिवाराचे प्रणेता व जिवा संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज नाशिक येथे आले असून, गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

स्वामी चिदानंद सरस्वती करणार गोदा स्वच्छता जनजागृती गंगा ॲक्शन परिवार : स्वच्छता दिवस पाळण्यासाठी नियोजन
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त उत्तराखंड ऋषीकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष गंगा ॲक्शन परिवाराचे प्रणेता व जिवा संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज नाशिक येथे आले असून, गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.स्वामी चिदानंद सरस्वती यांचा एक सप्ताहभर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम असून, या काळात ते आध्यात्मिक व रचनात्मक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यापूर्वी त्यांनी गंगासह अनेक नद्यांची स्वच्छता करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली. तसेच पर्यावरण, संरक्षण, शिक्षण व आरोग्य विषयक मोहीम राबविली आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी काय उपाययोजना करता येईल. यासाठी प्रबोधन करणार असून, संत संमेलनात सहभागी होणार आहेत.