स्वामी आणि वाड्रा यांच्यात ‘वेटर’वाद !

By Admin | Updated: June 26, 2016 02:10 IST2016-06-26T02:10:20+5:302016-06-26T02:10:20+5:30

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी वेटर्ससंबंधात आक्षेपार्ह टिपणीबद्दल भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली तर प्रत्युत्तरात भाजपा खासदारांनी

Swami and Vadra have 'waiters' faith! | स्वामी आणि वाड्रा यांच्यात ‘वेटर’वाद !

स्वामी आणि वाड्रा यांच्यात ‘वेटर’वाद !

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी वेटर्ससंबंधात आक्षेपार्ह टिपणीबद्दल भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली तर प्रत्युत्तरात भाजपा खासदारांनी वाड्रा यांना राजकीय वक्तव्य करण्याऐवजी तुरुंगाबाहेर कसे राहता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
स्वामी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना मंत्री कोट आणि टाय घालून वेटरसारखे दिसतात, असे मत मांडले होते. वाड्रा यांनी स्वामी यांच्या या वक्तव्यावरून फेसबुकवर प्रतिक्रिया नोंदविताना उपजीविकेसाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या वेटर्सना आत्मसन्मान नाही का? अपमानास्पद वक्तव्य करणे निंदनीय आहे, असा आरोप केला होता. स्वामींनी लगेच त्यांना प्रत्युत्तर दिले. वाड्रा यांनी राजकीय वक्तव्य करण्याऐवजी तुरुंगाबाहेर राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Swami and Vadra have 'waiters' faith!