स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:37 IST2025-10-29T12:36:59+5:302025-10-29T12:37:54+5:30
Modi Govt News: हा आकडा १० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
Modi Govt News: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्वच्छ भारत अभियान ५.० बाबत एक महत्त्वाची अपडेट शेअर केली आहे. जितेंद्र सिंह मते, २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या विशेष मोहिमेने पहिल्या तीन आठवड्यात ३८७ कोटी रुपयांची कमाई केली. सरकारी कार्यालये आणि संस्थांमधून रद्दी आणि वापरात नसलेल्या वस्तू विकून यातून ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, ही मोहीम चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यात सुरू होत असताना, हा आकडा ₹८ हजार ते ₹१० हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ सरकार केवळ स्वच्छतेतून हजारो कोटी रुपये वाचवत आहे आणि कमवत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत १.४८ कोटी चौरस फूट पेक्षा जास्त जागा मोकळी करण्यात आली आहे. ही मोकळी जागा आता सरकारी कामांसाठी, सार्वजनिक सेवांसाठी किंवा इतर उपयुक्त कारणांसाठी वापरली जाऊ शकते.
‘वेस्ट टू वेल्थ’ मोहिमेचे पुढे पाऊल
या वर्षीची मोहीम ‘वेस्ट टू वेल्थ’ या दृष्टिकोनातून पुढचे मोठे पाऊल उचलत आहे. एकेकाळी निरुपयोगी मानल्या जाणाऱ्या गोष्टी आता संसाधने म्हणून पाहिल्या जात आहेत. कचरा काढून टाकल्याने केवळ पर्यावरण स्वच्छ होत नाही, तर महसूल देखील मिळतो. देशभरात स्वच्छतेचा स्तर आणखी सुधारण्यासाठी, या मोहिमेशी संबंधित सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून त्या सामायिक करण्याचा सल्ला डॉ. जितेंद्र सिंह यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांना दिला आहे. या अभियानात सार्वजनिक ठिकाणचे कचऱ्याचे ढीग साफ करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि कोलकत्तासारख्या महानगरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. यामध्ये हजारो स्वयंसेवकांनी भाग घेतला.
दरम्यान, या वर्षी ‘कचरे से धन’ अभियानाचा पुढील टप्पा राबविण्यात आला. कचऱ्याचा पुनर्उपयोग, पुनर्वापरावर भर देण्यात आला. वेस्ट-टू-वेल्थ मॉडलवर आधारीत अभियानावर सरकारने जोर दिला. हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणच नाही तर रोजगार निर्मितीसाठी पण खास ठरले. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘कचरे से धन’ या खास विशेष स्वच्छता अभियानातून कमाईचा सेतू साधण्यात आला.
#Swachhata Campaign 5.0 Update:
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) October 28, 2025
In the campaign lasting from October 2 to 31, the figures of first three weeks reveal that, so far, ₹387 crore have already been earned by disposing of the scrap and by the time the four week campaign closes, the figure is likely to go up to… pic.twitter.com/jOS19X6YDw