सूवर्णप्राशन शिबीर
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
नांदेड: लहान बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने नांदेड दक्षिण युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी २२ मार्च रोजी वजिराबाद येथील यादव अहिर मंडल परिसरात मोफत सूवर्ण प्राशन शिबीर आयोजित केल्याची माहिती सरचिटणीस गोकुल बिशनकुमार यादव यांनी दिली़

सूवर्णप्राशन शिबीर
न ंदेड: लहान बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने नांदेड दक्षिण युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी २२ मार्च रोजी वजिराबाद येथील यादव अहिर मंडल परिसरात मोफत सूवर्ण प्राशन शिबीर आयोजित केल्याची माहिती सरचिटणीस गोकुल बिशनकुमार यादव यांनी दिली़ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ० ते १२ वयोगटातील मुला-मुलींना सूवर्णप्राशन शिबीराचा लाभ घेता येईल़ यावेळी आ़ डी़पी़ सावंत, माजी आ़ ओमप्रकाश ओमप्रकाश पोकर्णा, महापौर अब्दूल सत्तार, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, उपमहापौर आनंद चव्हाण , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण पोकर्णा, दक्षिण शहराध्यक्ष अब्दुल गफार यांची प्रमुख उपस्थिती राहील़ शिबीरात आलेल्या बालकांना सूवर्णप्राशनचा डोस योग्य प्रमाणात देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे़ डॉ़ चव्हाण, डॉ़ दिलीप पुरी, डॉ़ रमेश बनसोडे, डॉ़ राऊत, डॉ़ गवई यांच्यासह वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे़