शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:10 IST

Crime News: घरात पतीने ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही बनावट आणि संशयास्पद कागदपत्रे सापडल्याने आपला पती देशद्रोही तर नाही ना? अशी शंका आलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात गुन्हा  दाखल केल्याची घटना समोर आली आहे.

घरात पतीने ठेवलेल्या कागदपत्रांमध्ये काही बनावट आणि संशयास्पद कागदपत्रे सापडल्याने आपला पती देशद्रोही तर नाही ना? अशी शंका आलेल्या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात गुन्हा  दाखल केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यामध्ये एका महिलेने तिच्या पतीविरोधात देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शामली जिल्ह्यातील सरवर पीर गावातील हे संपूर्ण प्रकरण असून, येथील मनीषा नावाच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने सांगितले की, तिच्या पतीचं नाव इंतजार असं असून, तो गेल्या अडीच वर्षांपासून घरी आलेला नाही. तसेच फोरवरही बोलत नाही. एकेदिवशी तिने घरातील कागदपत्रे चाळली असता त्यामध्ये तिच्या पतीची वेगवेगळ्या नावांनी तयार केलेली कागदपत्रे आणि शाळेची प्रमाणपत्रे सापडली. या कागदपत्रांवर तिच्या पतीचे फोटोही लावलेले होते. एवढंच नाही तर इंतजार याने एका मौलवीकडून आपण अविवाहित असल्याचं प्रमाणपत्रही तयार करून घेतलेलं आहे. वास्तवात त्याला दोन मुलगे आहेत.

पतीची वेगवेगळ्या नावांनी असलेली आधारकार्ड आणि गुणपत्रके सापडल्यावर मनीषा हिला धक्का बसला. तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर मनीषा आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यावेळी मनीषा हिने या कागदपत्रांवरून तिचा पती देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच अशा कृत्यांमध्ये त्याचा काही सहभाग असेल तर आपली काही जबाबदारी नसेल असे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.

मनीषा आणि इंतजार यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. सुरुवातीची काही वर्षे सारं सुरळीत सुरू होतं. तसेच त्यांना दोन मुलंही झाली. नंतर इंतजार हा देहराडून येथे कामासाठी गेला. तसेच अडीच वर्षांपासून त्याने घरी येणं जाणं बंद केलं. तो अधूनमधून फोनवर बोलायचा. दरम्यान, त्याची बनावट कागदपत्रं सापडल्यानंतर मनीषा हिला संशय आला. तसेच तिने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. तसेच यामागे काही कौटुंबिक वाद आहेत का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश