संडे पान ६ पर्रा येथे कामगाराचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:35+5:302015-02-14T23:51:35+5:30

बार्देस : बांधकाम चालू असलेल्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर मूळ कर्नाटक व सध्या बेतोडा-फोंडा येथे राहणारा हजरत अली दाबोल (२०) हा तरुण पेरशेत-गिरी, बार्देस येथे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळला. दोबोल हा फरशी बसविण्याचे काम करीत होता.

Suspicious death of worker in Sunday page 6 | संडे पान ६ पर्रा येथे कामगाराचा संशयास्पद मृत्यू

संडे पान ६ पर्रा येथे कामगाराचा संशयास्पद मृत्यू

र्देस : बांधकाम चालू असलेल्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर मूळ कर्नाटक व सध्या बेतोडा-फोंडा येथे राहणारा हजरत अली दाबोल (२०) हा तरुण पेरशेत-गिरी, बार्देस येथे संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळला. दोबोल हा फरशी बसविण्याचे काम करीत होता.
सर्व कामगार त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. तो इतर कामगारांबरोबर राहत होता. नेहमीप्रमाणे सर्वजण झोपी गेले. मात्र, सकाळी इतर कामगार उठल्यावर त्यांना हजरत अली दाबोल मृतावस्थेत आढळला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांना सकाळी सव्वाआठच्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला. पुढील तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Suspicious death of worker in Sunday page 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.