शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेनंतर राज्यसभेतील 34 खासदारांचे निलंबन; आतापर्यंत 81 विरोधी खासदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:48 IST

संसदेत गदारोळ घातल्याप्रकरणी सभापतींनी आतापर्यंत 81 खासदारांवर कारवाई केली आहे.

नवी दिल्ली :  संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारीही(दि.18) दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केला. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत विरोधक गृहमंत्री अमित शाह यांना बोलण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आजच्या गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभेच्या अनेक खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

आतापर्यंत एकूण 81 विरोधी खासदारांचे निलंबन झाल आहे. शुक्रवारी दोन्ही सभागृहातील एकूण 14 खासदारांचे निलंबन केल्यानंतर आज, सोमवारी सभापतींनी आणखी 33 खासदारांना लोकसभेतून निलंबित केले. तर, राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी सभापतींनी 34 खासदारांना निलंबित केले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 81 खासदारांवर कारवाई झाली आहे.

लोकसभेतून निलंबित खासदारांची नावेकाँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमती, के नवासकानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगत रॉय, शताब्दी रॉय, असिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार, एस एस पलनामनिक्कम, तिरुवरुस्कर, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस रामा लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू यांना निलंबित करण्यात आले.

राज्यसभेतून निलंबित खासदारांची नावेतर, राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुघम, नासिर हुसेन, फुलो देवी नेतान, इम्राम प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरुल इस्लाम, रणजीत रंजन, फैयाज अहमद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल यादव, जावेद अली खान, जोस के मणी, महुआ मांझी, अजित कुमार आदी खासदारांचा समावेश आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांच्या निलंबनावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. आधी घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला, मग सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करत असल्याचे त्यांनी म्हटले. हे निरंकुश मोदी सरकार खासदारांचे निलंबन करून लोकशाहीची पयमल्ली करत आहे. विरोधी खासदार नसलेल्या संसदेत सरकार महत्त्वाचे प्रलंबित कायदे चिरडून टाकू शकते, अशी टीका त्यांनी केली.

 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा