शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 07:11 IST

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली.

सुरेश भुसारी नवी दिल्ली :  बारा  आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच हाेत असल्याचे सांगून काेणत्याही आमदारांना ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी निलंबित करण्याचा सभागृहाचा अधिकार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले. याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जानेवारीला आहे. 

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली. सुनावणीनंतर आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना सांगितले, तुम्ही घटनात्मक पाेकळी निर्माण करू शकत नाही. प्रत्येक मतदारसंघाला समान प्रतिनिधित्व असते. 

लाेकशाही मूल्यांना धाेका

निलंबन ही त्या आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली शिक्षा आहे. आज १२ आहेत. उद्या १२० असतील. लाेकशाहीमध्ये हा चुकीचा पायंडा पडू शकताे आणि त्यामुळे लाेकशाही मूल्यांसाेबत तडजाेड हाेण्याचा माेठा धाेका आहे, असे न्यायालयाने म्हटले.

...तर ती जागा रिक्त घाेषित करावी

काेणताही सदस्य परवानगीशिवाय ५९ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असेल, तर ती जागा रिक्त म्हणून घाेषित करावी, असा घटनेच्या कलम १९० (४) मध्ये स्पष्ट उल्लेख असल्याचे निरीक्षण कोर्टाने नाेंदविले.

‘सत्य जनतेसमोर येईल’ 

१२ आमदार निलंबनप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून वाद-प्रतिवाद करण्यात आले. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयातच या विषयात न्याय होईल आणि सत्य जनतेसमोर येईल. - आशिष शेलार 

आमदारांचे निलंबन केल्यामुळे संबंधित मतदारसंघाचे प्रश्न मांडले जात नाहीत. सभागृहाला ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार नाही. नियमानुसार काेणताही मतदारसंघ ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रतिनिधीत्वाशिवाय राहू शकत नाही. या प्रकरणापुरते बाेलायचे झाल्यास आता पुरे झाले. 

आम्हाला अधिक तपशील देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले. विधिमंडळाने दिलेल्या शिक्षेचा कालावधी हे न्यायालय ठरवू शकत नाही, हा महाराष्ट्र सरकारचे वकील सी. आर्यम सुंदरम यांचा युक्तिवाद सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावला. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेना