ंआव्हाड निलंबित-पान १ साठी
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित

ंआव्हाड निलंबित-पान १ साठी
आ ्षेपार्ह वक्तव्यामुळे आव्हाड निलंबित नागपूर : विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला आाव्हाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.आ. आव्हाड यांच्या निलंबनावर नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी विरोधी पक्ष अधिवेशनात सहभागी होणार नाही, असे जाहीर करीत सभात्याग केला. काँग्रेसनेही त्यांना साथ दिली. आठवड्याचा शेेवटा दिवस असल्यामुळे बरेच कामकाज करायचे आहे, असे सांगत संसदीय कामकाज मंत्री बापट यांनी विरोधकांना परतण्याची विनंती केली. मात्र, दिवसभर विरोधक सभागृहात परतले नाहीत. शेवटी विरोधी बाके रिकामी असतानाही सरकारने पुढील कामकाज उरकले. आव्हाड यांनी नाथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता मेहता अध्यक्षांनाच तुम्ही थांबा, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाड यांच्यासह विरोधी सदस्यांनी वेलमध्ये येऊन नारेबाजी केली. या वेळी मेहता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाड यांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. (प्रतिनिधी)