निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

By Admin | Updated: August 1, 2016 05:50 IST2016-08-01T05:50:54+5:302016-08-01T05:50:54+5:30

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) गुजरात केडरचे निलंबित अधिकारी प्रदीप शर्मा यांना हवाला व्यवहारात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली.

Suspended IAS officer Pradeep Sharma arrested | निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक

निलंबित आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक


अहमदाबाद : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) गुजरात केडरचे निलंबित अधिकारी प्रदीप शर्मा यांना हवाला व्यवहारात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी अटक केली.
शर्मा यांच्यावर गुजरातच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या तक्रारीवरून (एफआयआर) हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. चौकशीसाठी शर्मा ईडीच्या येथील कार्यालयात आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. ते चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे त्यांची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Suspended IAS officer Pradeep Sharma arrested