शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

काँग्रेस तोंडावर आपटला; सुषमा स्वराजांनी त्यांचा 'तो' पोल रिट्विट केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 1:44 PM

साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली.

नवी दिल्ली: आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे दात घशात  कसे घालायचे, याचा वस्तुपाठ नुकताच केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी घालून दिला. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी ट्विटरवर एक पोल घेण्यात आला होता. यामध्ये त्यांनी इराकमधील 39 भारतीयांच्या मृत्यू हे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे अपयश आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर हो किंवा नाही, असे दोन पर्याय देण्यात आले होते. साधारण 34 हजार लोकांनी यावर कौल दिला होता. यापैकी 76 टक्के लोकांनी यासाठी सुषमा स्वराज जबाबदार नसल्याचे सांगत 'नाही' या पर्यायावर क्लिक केले होते. तर 24 टक्के लोकांनी 'होय' या पर्यायावर क्लिक केले. साहजिकच भाजपाला लक्ष्य करण्याची काँग्रेसची खेळी त्यांच्यावरच उलटली. मात्र, त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या एका स्मार्ट खेळीने काँग्रेस आणखीनच तोंडघशी पडला. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आलेला हा पोल रिट्विट केला. स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा पोल पाहून अनेकांनी कमेन्टमध्ये आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी स्वराज यांनी ही संधी अचूक साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजcongressकाँग्रेसBJPभाजपा