एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज

By Admin | Published: August 9, 2016 10:26 AM2016-08-09T10:26:59+5:302016-08-09T10:35:24+5:30

पत्नीचा पासपोर्ट हरवल्याने एकटाच हनिमूनला जाणा-या फैजान पटेल याने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली

Sushma Swaraj ran for her husband only for help of honeymoon | एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज

एकटाच हनीमूनला गेलेल्या पतीच्या मदतीस धावल्या सुषमा स्वराज

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 9 - हनिमूनसाठी परदेशी जायची सर्व तयारी झाली होती. तिकीटही बुक झाली, व्हिसाही मिळाला. आणि ऐन वेळेला पत्नीचा पासपोर्ट हरवला. मग काय पत्नीला सोडून हे महाशय एकटेच हनिमूनसाठी निघून गेले. पण हनिमून एकट्याने करायचा कसा ? शेवटी फैजान पटेल याने आपल्या पत्नीच्या फोटोसहित काढलेला फोटो ट्विटरवर टाकत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली. 
 
ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असणा-या सुषमा स्वराज यांनी नेहमीप्रमाणे दखल घेत लगेच उत्तर दिलं. 'तुमच्या पत्नीला माझ्याशी संपर्क साधायला सांगा. तुमच्यासोबत बाजूच्या सीटवर ती असेल याची खात्री देते', असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलं. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डुप्लिकेट पासपोर्टही मिळवून दिला. सुषमा स्वराज यांच्या मदतीने एकमेकांची सोबत मिळालेल्या या दांपत्याने सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. 
 

Web Title: Sushma Swaraj ran for her husband only for help of honeymoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.