शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 7:08 PM

न्यायालयाने सवाल केला आहे की, मानसिक आजार असलेल्यांना सरकार विम्याच्या सुविधा का देत नाही ? २०१७ साली मानसिक आजार असलेल्यांसाठी सरकारने विमा सुविधा सुरु केली होती.

ठळक मुद्देदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि विमा कंपनीवर नजर ठेवणाऱ्या आईआरडीएआईला मानसिक आजार असलेल्यांना विमा का दिला जात नाही, असा प्रश्न विचारला आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार सन २०१९ पर्यंत चार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी गेल्या एक वर्षात एक लाख लोकांना मानसिक आजाराशी संबंधित विमा संरक्षण प्रदान केले आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर देशभर अनेक तर्क -वितर्कांना उधाण आले आहे. मानसिक तणाव आणि नैराश्यबाबत त्याच्या आत्महत्येला घेऊन अनेक चर्चा होत आहे. लोकं मानसिक आजार, नैराश्य याविषयांवरील चर्चा करत असून यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यावर सरकारला सवाल उपस्थित केला आहे. न्यायालयाने सवाल केला आहे की, मानसिक आजार असलेल्यांना सरकार विम्याच्या सुविधा का देत नाही ? २०१७ साली मानसिक आजार असलेल्यांसाठी सरकारने विमा सुविधा सुरु केली होती.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि विमा कंपनीवर नजर ठेवणाऱ्या आईआरडीएआईला मानसिक आजार असलेल्यांना विमा का दिला जात नाही, असा प्रश्न विचारला आहे. न्यायालयात आज जनहिताच्या मुद्द्यावर असलेल्या एका याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती रोहिंग्टन नरिमन, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या खंडपीठानेही या प्रकरणात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. वकील गौरव बन्सल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, २०१७ मध्ये सरकारने मानसिक आजार असलेल्यांना विमा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे, परंतु आतापर्यंत अशा रुग्णांना विम्याची सुविधा देण्यात आलेली नाही, त्यानंतर कोर्टाने नोटीस बजावली आहे.मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट, २०१७ लागू झाल्यानंतर सरकारने सांगितले की, देशभरातील मानसिक आजार असलेल्या रूग्णांनाही विम्याचा लाभ देण्यात येईल. या कायद्यानुसार मानसिक आजार असलेल्या रूग्णांना शारीरिक आजाराने ग्रस्त रूग्णांप्रमाणेच वागणूक दिली जाईल.१ लाखाहून अधिक जणांचा विमा होता. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार सन २०१९ पर्यंत चार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी गेल्या एक वर्षात एक लाख लोकांना मानसिक आजाराशी संबंधित विमा संरक्षण प्रदान केले आहे.मेंटल हेल्थ केअर अ‍ॅक्ट, २०१७ अंतर्गत काय तरतूद ?या कायद्यांतर्गत अशी तरतूद आहे की, सर्व विमा कंपन्यांना इतर आजारांप्रमाणे मानसिक आजाराच्या उपचारांसाठी वैद्यकीय विमा द्यावा लागेल. इतर रोगांमध्ये, विमा संरक्षण कोणत्या आधारावर प्रदान केले जाते, मानसिक आजारावर देखील त्याच आधारावर संरक्षण द्यावे लागेल.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

 

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतNew Delhiनवी दिल्ली