शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

'त्या' अभिनेत्रीविरोधात एफआयआर; सुशांतच्या वडिलांनी आत्महत्येसाठी धरलं जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 19:53 IST

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा वडिलांचा दावा

पाटणा: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रियानं प्रेमात सुशांतची फसवणूक केली. त्याच्याकडून पैसे काढून घेतले. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं, असे गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी रियावर केले आहेत. त्यानंतर पाटणा पोलिसांची पथक मुंबईत पोहोचलं आहे. रिया चक्रवर्तीविरोधात पाटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात पाच पानी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. 'रियानं सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. त्याच्याकडून पैसे मिळवले. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं,' असं सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे. पाटणा पोलिसांनी सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपावरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा क्रमांक २४१/२० आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीच्या ४०६, ४२०, ३४१, ३२३ आणि ३४२ कलमांचा उल्लेख केला आहे. पाटणा पोलीस दलातील चार जण मुंबईत दाखल झाले आहेत. आपली प्रकृती ठीक नसल्यानं खटला लढण्यासाठी मुंबईला जाऊ शकत नाही. त्यामुळे पाटण्यातच एफआयआक दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची ११ तास चौकशी केली आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी काही दिवसांपूर्वी रियानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. सुशांतनं १४ जूनला मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांकड़ून सध्या दिग्दर्शक, निर्मात्यांची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ३७ हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात महेश भट्ट यांच्या चौकशीनंतर मंगळवारी दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यांची अंबोली पोलीस ठाण्यात तीन तास चौकशी करण्यात आली. तसेच ड्राइव्ह चित्रपटादरम्यान धर्मा प्रॉडक्शनसोबत सुशांतचा वाद झाला होता, अशी माहिती सुशांतच्या व्यवस्थापकांच्या चौकशीतून समोर आली होती. याबाबतच मेहता यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनीही सर्व आरोप फेटाळले आहे. तसेच सुशांतसोबतच्या ड्राईव्ह चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आठवड् अखेरीस करण जोहरचीही चौकशी करण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची उडी; गृहमंत्री अनिल देशमुखांची घेतली भेटसुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीMahesh Bhatमहेश भटKaran Joharकरण जोहर